भारताच्या पावन भूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांचा सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशा दर्शक ठरलेला आहे. अशा या थोर महापुरुषात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सर्वात वर आहे. डॉ. भीमराव रामजी तथा बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते.
त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरूद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. आपल्याला तर माहीतच आह दरवर्षी १४ एप्रिल ला बाबासाहेबांची जयंती साजरी केली जाते, त्या जयंतीनिमित्त आपण ह्या विचारांना आपल्या जीवनात लागू करू शकतो.आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे हे विचार आपल्याला जिवनात एक नवीन उत्साह देऊन आपले जीवन स्फूर्तिदायक बनविण्यात मदत करतील.
अश्या या महामानवाला artworkbird चा मनाचा मुजरा सोबतच आपल्यासाठी या लेखात आम्ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार घेऊन आलो होतो आशा करतो आपल्याला आवडले असतील आपल्याला आवडल्यास या लेखाला आणि या महान विचारांना आपल्या मित्रांना सोशल मीडियावर शेयर करायला विसरू नका.
How to download:तुम्ही किती अंतर चालत गेलात यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात हे अधिक महत्वाचे आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर
माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये. लाज वाटायला पाहिजे ती दुर्गुणांची.
डॉ बाबासाहेब आंबेडकर
बुद्धिमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम लक्ष्य असले पाहिजे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर
उगवत्या सूर्याला नमस्कार करतांना मावळत्या चंद्राला विसरू नका.
डॉ बाबासाहेब आंबेडकर
माणूस धर्माकरिता नाही, धर्म माणसाकरिता आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर
हिंसा ही वाईट गोष्ट आहे परंतु गुलामी ही त्यापेक्षाही वाईट गोष्ट आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर
समता, स्वातंत्र्य, विश्वबंधुत्व या तीन तत्वावर आधारित जीवनमार्ग म्हणजे लोकशाही.
डॉ बाबासाहेब आंबेडकर
अस्पृश्यता जगातील सर्व गुलामगिरीपेक्षा भयंकर व भिषण आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर
माणसाने खावे जगण्यासाठी, पण जगावे समाजासाठी.
डॉ बाबासाहेब आंबेडकर
लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे ‘हुकूमशाही’ आणि माणसां-माणसांत भेद मानणारी ‘संस्कृती’.
डॉ बाबासाहेब आंबेडकर
शिका ! संघटीत व्हा ! संघर्ष करा !
डॉ बाबासाहेब आंबेडकर
तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही.
डॉ बाबासाहेब आंबेडकर
अग्नी तून गेल्याशिवाय माणसाची शुद्धी होत नाही.
डॉ बाबासाहेब आंबेडकर
चारित्र्य शोभते संयमाने, सौंदर्य शोभते शीलाने.
डॉ बाबासाहेब आंबेडकर
काम लवकर करावयाचे असेल तर मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका.
डॉ बाबासाहेब आंबेडकर
तुम्ही किती अंतर चालत गेलात यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात हे अधिक महत्वाचे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर
जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही आणि जो मरायला भितो तो आधीच मेलेला असतो.
डॉ बाबासाहेब आंबेडकर
इतरांचे दुर्गुण शोधणापेक्षा त्यांच्यातील सदगुण शोधावे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर
शिक्षण हे वाघीणीचो दूध आहे आणि जो ते प्राषण करेल तो वाघासारखा गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.
डॉ बाबासाहेब आंबेडकर
आकाशातील ग्रह-तारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग ?
डॉ बाबासाहेब आंबेडकर
शील, करुणा, विद्या,मैत्री, प्रज्ञा या पंचतत्वावर प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चरित्र बनविले पाहिजे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर
ह्या जगात स्वाभिमानाने जगायला शिका. आपल्याला काही तरी करून दाखवायचे आहे. अशी महत्त्वाकांक्षा सदैव असली पाहिजे. लक्षात ठेवा, जे संघर्ष करतात तेच नेहमी यशस्वी होतात.
डॉ बाबासाहेब आंबेडकर
आम्ही पहिले आणि शेवटी एक भारतीय आहोत.
डॉ बाबासाहेब आंबेडकर
एक महान माणूस प्रतिष्ठित माणसापेक्षा अशा प्रकारे वेगळा असतो की तो समाजाचा सेवक होण्यासाठी तयार असतो.
डॉ बाबासाहेब आंबेडकर
Please if you want any changes or you got any mistake on above Images please comment and give your valuable feedback.
Thank you guys hope you like it.. :)