ज्याचा विचार तुम्ही करणार तेच तुम्ही बनणार. जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही कमकुवत आहेत तर तुम्ही कमकुवतच बनलं आणि जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही बलवान आहेत तर तुम्ही बालवानच बनाल.
स्वामी विवेकानंद
घर्षण केल्याशिवाय रत्न उजळतनाही.त्याचप्रमाणे सातत्याने प्रयत्न केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही.
स्वामी विवेकानंद
कोणाचीही निंदा करू नका. जर तुम्ही कोणाच्या मदतीसाठी हात पुढे करू शकत असाल तर नक्की करा. जर ते शक्य नसेल तर हात जोडा आणि त्यांना आशिर्वाद द्या आणि त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या.
स्वामी विवेकानंद
मनाची शक्ती हि सूर्याच्या किरणांसारखी असते जेव्हा ती एका केंद्रबिंदूवर केंद्रित होते तेव्हाच ती प्रखरतेने चमकते.
स्वामी विवेकानंद
कधीही कुणाची निंदा करु नका. जर तुम्हाला त्यांना मदतीचा हात पुढे करायचा असेल तर नक्कीच पुढे करा, नसेल हात जोडा. आपल्या भावनांनी त्यांना आशिर्वाद द्या व त्यांना त्यांच्या मार्गावरून जाऊ द्या.
स्वामी विवेकानंद
दिवसातून एकदा तरी स्वत: शी बोला, अन्यथा आपण या जगातील एका उत्कृष्ट व्यक्तीला हरवून बसाल.
स्वामी विवेकानंद
मेंदू आणि ह्रदय या दोघात संघर्ष चालु असेल, तर नेहमी ह्रदयाचे ऐका.
स्वामी विवेकानंद
जो अग्नी आपल्याला उब देतो तोच अग्नी आपल्याला नष्टही करू शकतो. पण हा अग्नीची दोष नाही.
स्वामी विवेकानंद
जी व्यक्ती गरीब आणि असहाय्य व्यक्तींसाठी अश्रू ढाळते ती महान आत्मा आहे. तसं नसेल तर ती दुरात्मा आहे.
स्वामी विवेकानंद
असं कधीच म्हणू नका की,मी करू शकत नाही. कारण तुम्ही अनंत आहात, तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकता.
स्वामी विवेकानंद
शक्ती जीवन आहे तर निर्बलता मृत्यू आहे. विस्तार म्हणजे जीवन तर आकुंचन म्हणजे मृत्यू आहे. प्रेम जीवन आहे तर द्वेष मृत्यू आहे.
स्वामी विवेकानंद
जे कोणी आपल्याला मदत करतात त्यांना विसरू नका. जे कोणी आपल्यावर प्रेम करतात त्यांचा द्वेष करू नका आणि जे कोणी आपल्यावर विश्वास ठेवतात त्यांना फसवू नका.
स्वामी विवेकानंद