सावरकर हे एक महान देशभक्त, विद्वान, कवी आणि लेखक होते. विद्यार्थीदशेतच त्यांनी देशभक्तीपर उपक्रम सुरू केले. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी अभिनव भारतची स्थापना केली. सावरकरांना जन्मजात क्रांतिकारक म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. सावरकरांनी अनेक पुस्तके लिहिली, त्यापैकी भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास हा प्रमुख ग्रंथ आहे.
पुण्यामध्ये शिकत असताना त्यांनी अभिनव भारत नावाची जहाल क्रांतिकारी संघटना स्थापन केली. बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला गेले असताना तेथे त्यांनी क्रांतीकारांची मोठी संघटना तयार केली. म्हणून बॅरिस्टर होऊन त्यांनी देशद्रोही ठरवून इंग्रज सरकारने बॅरिस्टर पदवी नाकारली. ब्रिटिशांच्या तावडीतून सुटण्यासाठी त्यांनी बोटीवरून मार्सेलिस च्या समुद्रात मोठ्या धैर्याने उडी घेतली होती. परंतु ते पकडले जाऊन त्यांना काळ्यापाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. अंदमानच्या तुरुंगात त्यांचे अतिशय हाल झाले. पण अशा नरक यातना भोगत असतानाही त्यांनी काळेपाणी सारख्या सुंदर पुस्तकाचे लेखन केले. " ने मजसी ने परत मातृभूमीला" हे त्यांचे गीत युगानुयुगे लोकांच्या मनात झंकारित राहील.
वीर विनायक दामोदर सावरकर 1937 नंतर मोठ्या प्रमाणावर प्रवास करू लागले आणि हिंदू राजकीय आणि सामाजिक ऐक्याचा पुरस्कार करणारे शक्तिशाली वक्ते आणि लेखक बनले. हिंदू महासभेच्या राजकीय पक्षाचे अध्यक्ष या नात्याने सावरकरांनी भारतातील हिंदू राष्ट्र (हिंदू राष्ट्र) या संकल्पनेचे समर्थन केले. देशाला स्वतंत्र करण्यासाठी आणि भविष्यात हिंदूंचे रक्षण करण्यासाठी त्यांनी तेथूनच हिंदूंचे सैन्यीकरण सुरू केले.
मित्रानो आज आम्ही तुमच्यासाठी swatantryaveer savarkar quotes in marathi घेऊन आलो आहोत तर चला मग पाहूया ते.
How to download:कष्ट च तर ती शक्ती आहे जे माणसाला खऱ्याच्या कसोटीवर पारखते आणि यशाकडे नेण्यास मदत करते.
Veer Savarkar
जेव्हा सूर्य काजव्यांची मन धरणी करू लागतो तेव्हा सौरमंडल सुद्धा त्याच्या बाजूने उभे असत नाही.
Veer Savarkar
आपल्या प्रामाणिक पणाचा वापर होईल पण केव्हा तर दुसर्यास प्रामाणिक बनविण्याइतका आपला प्रामाणिक पणा बलवान असेल तेव्हाच.
Veer Savarkar
हिंदुत्व हा केवळ एक शब्द नव्हे, तर तो इतिहास आहे. ते मनापासून समग्र हिंदु बांधवाना आवाहन करतात की, यज्ञकुंडातील अग्निहोत्र ज्याप्रमाणे कायम प्रज्वलित राहते, त्याप्रमाणे तुम्ही हिंदुत्वाच्या भावनेचे स्फुल्लिंग जतन करून ठेवा.
Veer Savarkar
योग्य वेळ येताच त्याला फुंकर घालून भरतखंडभर हिंदुत्वाचा डोंब उसळून दिला की, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत हिंदुत्वाच्या भावनेने जनता भारली जाईल.
Veer Savarkar
धर्मग्रंथ हे ईश्वरकृत नसून मनुष्यकृत आहेत
Veer Savarkar
मी समुद्रात टाकलेली उडी लोक विसरले तरी चालेल, पण माझा सामाजिक विचार त्यांनी विसरू नये
Veer Savarkar
उदात्त ध्येयासाठी केलेलं कोणतेही बलिदान वाया जात नाही.
Veer Savarkar
आपण एकटे असलो तरी हरकत नाही. आपल्यामागे कुणी येवो ना येवो . जे आपल्याला करावसं वाटत ते करण्यातच आपल्या जीवनाची सार्थकता आहे.
Veer Savarkar
तयारी मध्ये शांतता आणि अंमलबजावणी मध्ये धैर्य, संकटाच्या क्षणांमध्ये हाच एक सुरक्षा साठी शब्द असावा.
Veer Savarkar
एक देश एक देव, एक जात, एक मन आपल्या सर्वांना भेद न करता, यात काही शंका न घेता बंधू आहे.
Veer Savarkar
एक देश एक देव, एक जात, एक मन आपल्या सर्वांना भेद न करता, यात काही शंका न घेता बंधू आहे.
Veer Savarkar
यंत्राने बेकारी वाढत नाही तर विषम वाटणीमुळे वाढते.
Veer Savarkar
अहिंदू म्हणून प्रत्यक्ष इंद्रपद जरी मिळाले तरी ते लाथाडून शेवटचा हिंदू म्हणून मी मरेन!
Veer Savarkar