Love is so beautiful & easy म्हणत फेब्रुवारीचं दमदार स्वागत केलं जातं. प्रेमाची हवा आसमंतात दरवळत असल्याचे भासते. तरूणाईच्या उत्साहाला, आनंदाला उधाण आल्यामुळे प्रत्येक दिवसाचं सेलिब्रेशन नव्या कल्पकतेसह नव्या ढंगात केलं जातं. फेब्रुवारी महिन्याची उत्सुकता ही केवळ Valentine Day साठी अनेकांना असते. गालावर हास्याची कळी उमलवणाऱ्या, खूप दिवस मनात साठवून राहिलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी, विविध प्रेममय डेजच्या रंगात रंगून जाण्यासाठी तरुणाईच्या आनंदाला पारावरच उरलेला नसतो. प्रेम म्हणजे काय? असं विचारलं तर प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं, प्रेमात Logic नसतं Magic असतं असं उत्तर आता Common झालंय.
प्रेमाची प्रकर्षाने आठवण होते ती Valentine Day च्या निमित्ताने. Rose देऊन Propose करून नात्याची सुरुवात करायची नंतर Chocolate, Teddy यासारखे gifts देऊन नातं फुलवून Promise करायचं. Kiss & Hug या प्रेमाच्या दोन पायऱ्या चढत आनंदात आपला Valentine Day साजरा करायचा. मात्र त्यानंतर Slap, Kick, Flirting, Confession, Miss करत शेवटी ब्रेकअपने रंगीन, प्रेममय फेब्रुवारीतील आठवड्याची सांगता करायची. खरं प्रेम म्हणजे नेमकं काय? या प्रश्नाचं उत्तर आता हसण्यावारी नेलं जातं. प्रेमाची व्याख्या बदलतेय... सगळ्यांशीच flirt करायचं असा सध्याच्या प्रेमाचा नवा फंडा. हल्ली ब्रेकअपची पण जोरदार पार्टी दिली जाते. रिलेशनशीपचं स्टेट्सबद्दल अगदी बिनधास्तपणे आजची तरुणाई व्यक्त होते.
खरं सांगायचं तर प्रेम अशी भावना आहे की ते व्यक्त करण्यासाठी 14 फेब्रुवारीची म्हणजे व्हॅलेंटाईन डे ची खास वाट बघण्याची गरज नाही. पण त्यातही एक वेगळी गंमत अनुभवायला आणि रोजच्या रूटीनमधून बाहेर येऊन हलकं फुलकं होऊन मजा करायला हे डेज साजरे करायला देखील काहीच हरकत नाही. रोजचाच दिवस प्रेमाचा आहे असं समजून जगलं तर जगायलाही नक्कीच मजा येईल. सध्याचा प्रेमात दिखावा जास्त असतो. दोस्तीवाला प्यार सध्या प्रेमाचा नवा फंडा आहे. www.artworkbird.co.in या संकेत स्थळावरील शुभेच्छांचे ग्रीटिंग्स, valentine day marathi shubhechha valentine day msg in marathi, valentine day wish in marathi नेहमी पाठवत राहून एकमेकांच्या मनातील स्थान निश्चित करूयात.
Please if you want any changes or you got any mistake on above Greetings please comment and give your valuable feedback.
Thank you guys hope you like it.. :)